सहा वर्षापुर्वी झालेले अपहरण उघडकीस : दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:31 IST2019-04-03T18:31:19+5:302019-04-03T18:31:57+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील गुलजार भोसले याने ठाणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलेल्या एका दहा वर्षीय मुलीचे अपहरण तब्बल सहा वर्षांनी उघडकीस आले आहे.

सहा वर्षापुर्वी झालेले अपहरण उघडकीस : दोघे ताब्यात
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील गुलजार भोसले याने ठाणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलेल्या एका दहा वर्षीय मुलीचे अपहरण तब्बल सहा वर्षांनी उघडकीस आले आहे. या संदर्भात बेलवंडी पोलिस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुलजार भोसले व गोविंद भोसले या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मानवी तस्करीचे एका महिन्यात दुसरे प्रकरण श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आले आहे. घोटवी येथील गुलजार भोसले याने आई-वडीलांची नजर चुकवून ठाणे रेल्वे स्टेशनरून सहा वर्षांपुर्वी चार वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. तिचे नाव अर्चना ऊर्फ कावेरी गुलजार भोसले असे ठेवले. तिला घोटवी येथील रानमळा प्राथमिक शाळेत घातले. त्याच पध्दतीने मुन्ना, मुक्या या दोन मुलांना अशाच पद्धतीने आणले. ३१ मार्च रोजी दररोज होणा-या छळाला कंटाळून मुन्ना पळून गेला. मुन्ना पळून गेल्याने गुलजार व गोविंद या दोघांनी कावेरी ऊर्फ अर्चनावर संशय धरला. तिला मारहाण केली. या छळाला कंटाळून अर्चना हीने मंगळवारी सायंकाळी नऊ वाजता श्रीगोंदा रेल्वे स्थानक गाठले. घाबलेल्या अवस्थेतील अर्चनाची रेल्वे आणि श्रीगोंदा पोलिसांनी विचारपूस केली असता अर्चना हीने पोलिसांना थरारक कहाणी सांगितले. याप्रकरणी गुलजार भराश्या भोसले व गोविंद गुलजार भोसले या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस कॉस्टेबल के. एम. देशमुख करीत आहेत.