अल्पवयीन मुलाचे अपहरण
By Admin | Updated: July 30, 2016 00:32 IST2016-07-30T00:17:28+5:302016-07-30T00:32:06+5:30
अहमदनगर : शहरातील एमआयडीसील पितळे वस्ती येथून इयत्ता अकरावीत शिकणारा संदेश दौलत म्हस्के (वय १६) हा तेरा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे़

अल्पवयीन मुलाचे अपहरण
अहमदनगर : शहरातील एमआयडीसील पितळे वस्ती येथून इयत्ता अकरावीत शिकणारा संदेश दौलत म्हस्के (वय १६) हा तेरा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे़ याबाबत सदर मुलाच्या नातेवाईकांनी २५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉँस्टेबल एच़ के. शेख हे करत आहेत़