श्रीगोंद्यात मुलीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:09 IST2018-04-17T19:06:56+5:302018-04-17T19:09:14+5:30
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला.

श्रीगोंद्यात मुलीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण
श्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलाशी लग्न लावण्यासाठी नातेवाईकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीगोदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुलाला १८ वर्षे पूर्ण आहेत, असा खोटा दाखला करुन घेतला. त्यानंतर मुलाला पळवून नेऊन आळंदी येथे १९ मार्च रोजी विवाह केला. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीसह तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.