वक्तृत्व स्पर्धेत खुशी ठुबे, श्रावणी माेरे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:53+5:302021-08-20T04:25:53+5:30
केडगाव : केडगावच्या ओंकारनगर महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्व. संपतलाल कटारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित ...

वक्तृत्व स्पर्धेत खुशी ठुबे, श्रावणी माेरे प्रथम
केडगाव : केडगावच्या ओंकारनगर महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्व. संपतलाल कटारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले. लहान गटात खुशी सौरभ ठुबे, तर मोठ्या गटात श्रावणी सुरेश मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका सुनीता कोतकर, नगरसेविका शांताबाई शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, श्री आयटी कॉम्प्युटर्सचे विनायक ससे, केंद्र समन्वयक अरुण पालवे, प्रा. संतोष कटारिया, राजेंद्र कटारिया, मनीषा शिंदे, प्रवीण मुळे, अर्जुन शिंदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, संकेत कटारिया, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी इ. १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांचा छोटा गट व इ. ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचा मोठा गट होता. ही स्पर्धा गुगल मीटवर ऑनलाइन घेण्यात आली. लहान गटात खुशी सौरभ ठुबे प्रथम, सायली सयाजी काळे द्वितीय तर श्रद्धा संजय वर्तले हिने तॄतीय क्रमांक पटकाविला.
मोठ्या गटात श्रावणी सुरेश मोरे प्रथम, अर्पण कवित वाघमारे द्वितीय, साई संजय वर्तले व आशिष ज्ञानेश्वर पाडळे यांनी तॄतीय क्रमांक पटकाविला. अरुण पालवे व मनीषा शिंदे यांनी या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण केले. मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्रावणी सुरेश मोरे या विद्यार्थिनीने पारितोषिकाची रक्कम शालेय परिसरात व घराच्या परिसरात झाडे लावण्यासाठी दिली.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. शिवराज वाघमारे यांनी आभार मानले. सहशिक्षिका वॄषाली गावडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.