वृद्धेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी खेडकर, काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:40+5:302021-09-10T04:27:40+5:30

तिसगाव : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी उषा पांडुरंग खेडकर व नारायण काकडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष ...

Khedkar, Kakade as Expert Director of Vriddheshwar Factory | वृद्धेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी खेडकर, काकडे

वृद्धेश्वर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी खेडकर, काकडे

तिसगाव : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी उषा पांडुरंग खेडकर व नारायण काकडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच सभा झाली. त्यामध्ये सार्वत्रिक संमतीने हा निर्णय घेण्यात आला. जि.प.च्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती पांडुरंग खेडकर यांचे गतवर्षी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी उषा खेडकर यांना संधी देण्यात आली. नारायण काकडे कोरडगाव सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांनाही संधी देण्यात आली, अशी माहिती उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ, सुभाष ताठे, सुभाष बुधवंत, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, शरद अकोलकर, विधिज्ञ अनिल फलके, डॉ. यशवंत गवळी, कुशीनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, शेषराव ढाकणे, सिंधूबाई जायभाय, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार आदींसह प्रशासन अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी केले. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी आभार मानले.

Web Title: Khedkar, Kakade as Expert Director of Vriddheshwar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.