खावटी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:19+5:302021-07-26T04:20:19+5:30
श्रीरामपूर : खावटी अनुदान योजना महाविकास आघाडी सरकारने सुरू केली, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. ...

खावटी अनुदान
श्रीरामपूर : खावटी अनुदान योजना महाविकास आघाडी सरकारने सुरू केली, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता खावटी योजनेंतर्गत रोख रकमेसह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप शनिवारी तहसील कार्यालयात करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार कानडे बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाने, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, व्ही. धनान, पुष्पा तेलंग, नवनाथ गायकवाड, वैशाली वांढेकर, डी.बी. चव्हाण उपस्थित होते.
कानडे म्हणाले, इतर तालुक्यांच्या तुलनेत श्रीरामपूरमध्ये सर्वाधिक लाभार्थ्यांना योजनेतून लाभ देण्यात यश मिळाले आहे. खावटी योजनेसंदर्भात माहिती घेऊन आदिवासी विभाग, तसेच महसूल यंत्रणा यांचे प्रशिक्षण घेतले. त्यात सर्वेक्षण करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींची माहिती घेतली. योग्य प्रकारे नियोजन केले. त्यामुळे लाभ देता आला. मतदारसंघातील श्रीरामपूर व राहुरीतील आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले. योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो आदिवासी समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाल्याने समाधानी आहे.
--------
फोटो ओळी : कानडे
तहसील कार्यालयात खावटी अनुदान योजनेचे वाटप करताना आमदार लहू कानडे.
-------