खर्डा सरपंच पतीकडून हमालास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:45+5:302021-07-14T04:24:45+5:30
जामखेड : उसने दिलेले पैसे आत्ताच पाहिजे, असे म्हणत खर्डा गावचे सरपंच पती यांनी हमालाची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

खर्डा सरपंच पतीकडून हमालास मारहाण
जामखेड : उसने दिलेले पैसे आत्ताच पाहिजे, असे म्हणत खर्डा गावचे सरपंच पती यांनी हमालाची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. हमालाच्या तक्रारीवरुन जामखेड पाेलीस ठाण्यात सरपंच पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आनंदवाडी येथील शरद अंकुश गिते हा हमाली करीत आहे. शुक्रवारी (दि. ९) दुपारी साडेतीन वाजता शरद गिते हा आनंदवाडी वरून खर्डा गावाकडे मोटारसायकलवरून येत असताना इंग्लिश स्कूल शाळेजवळ खर्डा गावचे सरपंच पती आसाराम गोपाळघरे यांनी गिते यांची मोटारसायकल अडविली. माझे उसने दिलेले पैसे मला आत्ताच पाहिजे असे म्हणून गिते यांची गचांडी धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. गिते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच पती आसाराम गोपाळघरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.