खर्डा इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्तीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:34+5:302021-08-22T04:25:34+5:30
खर्डा : राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) इयत्ता आठवीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या परीक्षेला खर्डा येथील रयत ...

खर्डा इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्तीत यश
खर्डा : राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) इयत्ता आठवीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या परीक्षेला खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूलचे २६ विद्यार्थी बसले होते. यापैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सायली सचिन जावळे ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाली आहे. तिला इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी १२ हजार प्रमाणे एकूण ४८ हजार रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य किशोर कांकरिया, डॉ. विवेक दिंडोरे, सरपंच आसाराम गोपाळघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण कुंभार, प्राचार्य उगले, उपप्राचार्य दुधाळ, पर्यवेक्षक रमेश पाटील, नानासाहेब मोळवणे, विषय शिक्षक संदीप टेकाळे, अर्जुन गिते, रामदास उगले आदींनी कौतुक केले.