येळपणे येथील खंडेश्वर यात्रौत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:27+5:302021-02-25T04:25:27+5:30
दरवर्षी ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री खंडेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात भरते. या यात्रेसाठी श्रीगोंद्यासह शिरूर, पारनेर तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात ...

येळपणे येथील खंडेश्वर यात्रौत्सव रद्द
दरवर्षी ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री खंडेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात भरते. या यात्रेसाठी श्रीगोंद्यासह शिरूर, पारनेर तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, या वर्षी २५ ते २८ फेब्रुवारी रोजी होणारा यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंंचायत व यात्रा उत्सव समितीने घेतला आहे. त्यामुळे या काळात गावातील भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करता आपापल्या घरी श्री खंडेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा करावी. कोरोना महामारी रोखण्यासाठी विनाकारण गर्दी करू नये. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळत प्रशासनाने जे निर्बंध घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे अवाहान यात्रा उत्सव समिती व येळपणे ग्रामस्थांच्या वतीने केले आहेेे.