केलवड गावात तरुणीची आत्महत्या
By Admin | Updated: May 23, 2017 14:52 IST2017-05-23T14:52:39+5:302017-05-23T14:52:39+5:30
केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.

केलवड गावात तरुणीची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
अस्तगाव, दि़ २३ - राहाता तालुक्यातील केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.
तरुणीच्या घरापासून अर्ध्या कि़मी़च्या अंतरावर इंद्रभान नामदेव गमे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनी राहाता पोलिसांना खबर दिली़ त्यानंतर तात्काळ हेड कॉन्स्टेबल गांगड व मगर हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीला विहिरीतून वर काढण्यात आले़ पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. राहाता ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करुन पोलिसांनी पंचनामा केला आहे.
राणी रजपुत या तरुणीचा साखरपुडा झाला होता़ १० जून रोजी तिचा विवाह होणार होता़ तिच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच तिने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्यामुळे लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव होत नसल्याच्या कारणातून तिने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे़