केडगावमध्ये पुन्हा हत्या : परप्रांतीय कामगारांकडून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 10:36 IST2018-12-05T10:35:57+5:302018-12-05T10:36:12+5:30
महापालिका पोटनिवडणुकीदरम्यानचे हत्याकांड ताजे असतानाचा पुन्हा एकदा केडगावमध्ये एकाचा खून झाला.

केडगावमध्ये पुन्हा हत्या : परप्रांतीय कामगारांकडून एकाचा खून
अहमदनगर : महापालिका पोटनिवडणुकीदरम्यानचे हत्याकांड ताजे असतानाचा पुन्हा एकदा केडगावमध्ये एकाचा खून झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात परप्रांतीय कामगारांनी मनोज अंधारे याच्या किरकोळ कारणावरून खून केला.
शास्त्रीनगर भागामध्ये अमित मुथ्था यांचा बांधकामाचा प्रोजेक्ट सुरु आहे. या बांधकामावर मनोज अंधारे वॉचमन म्हणून काम पाहात होता. याच ठिकाणी काही प्ररप्रांतीय मजूरही काम करत होते. रात्रीच्या सुमारास परप्रांतीय कामगारांनी मोठ्या आवाजात गाणे लावली होती. गाण्याचा आवाज कमी करण्याचे अंधारे याने सांगितल्याने या कामगारांनी अंधारे यास जबर मारहाण करत खून केला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी याप्रकरणी दोन ते तीन जणास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.