केडगाव मंडलाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:48+5:302021-02-06T04:38:48+5:30

.... दिव्यांगांना हयातीचे दाखल देण्याचे आवाहन अहमदनगर: महापालिकेच्या वतीने दिव्यांना उदरनिर्वाह निधी देण्यात येतो. त्यासाठी हयातीचा दाखल आवश्यक असून, ...

Kedgaon Mandal meeting | केडगाव मंडलाची बैठक

केडगाव मंडलाची बैठक

....

दिव्यांगांना हयातीचे दाखल देण्याचे आवाहन

अहमदनगर: महापालिकेच्या वतीने दिव्यांना उदरनिर्वाह निधी देण्यात येतो. त्यासाठी हयातीचा दाखल आवश्यक असून, शहरातील दिव्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत दाखले सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

..

आठ सदस्यांची मंगळवारी सभा

अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समितीची सभा येत्या मंगळवारी होत आहे. नवीन आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी बुधवारी महासभा घेण्यात येणार असून, त्यापूर्वी एक दिवस आधीच सभापतींनी सभा बोलवली असून, या सभेत आठच सदस्य उपस्थित राहू शकतील.

..

माळीवाड्यात स्वच्छता मोहीम

अहमदनगर: महापालिकेने स्वच्छ अभियानात सहभाग घेतला असून, केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे. या पार्श्वभमीवर आरोग्य विभागाने शुक्रवारी माळीवाडा परिसरात स्वच्छता केली. उपायुक्त यशवंत डांगे यांनी स्वच्छतेत सहभाग घेतला होता.

...

Web Title: Kedgaon Mandal meeting