केडगावच्या पाण्यात वाटा नाहीच
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:49+5:302020-12-09T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : केडगाव पाणी योजनेतून पाणी देण्याच्या सेना नगरसेवकांच्या मागणीवर केडगावचे नाव काढायचे नाही, अशा ...

केडगावच्या पाण्यात वाटा नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : केडगाव पाणी योजनेतून पाणी देण्याच्या सेना नगरसेवकांच्या मागणीवर केडगावचे नाव काढायचे नाही, अशा शब्दांत मनोज कोतकर यांनी केडगावच्या नगरसेवकांना सुनावले. त्यामुळे भाजप-सेनेतील दुरावा यामुळे आणखी वाढला आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. विकास नियमावलीचा विषय अंतिम मंजुरीसाठी सभेसमोर होता. मात्र, कल्याण रोडवरील पाणी प्रश्नावरच ही सभा गाजली. सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेतून कल्याण रोड परिसराला पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. ही मागणी सेनेकडून पुढे आल्याने स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर चांगलेच संतापले. कोतकर हे केडगाव भागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे कोतकर यांनी केडगावचे नाव घ्यायचे नाही, अशा शब्दांत सेनेच्या नगरसेवकांना खडेबोल सुनावले. केडगाव उपनगराला आधीच चार दिवसांतून एकदा पाणी मिळते. या भागातील पाणी प्रश्न गंभीर आहे. केडगाव उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतून अन्य भागाला पाणी देता येणार नसल्याचे कोतकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कल्याण रोडवरील पाणी प्रश्नावर सेनेचे नगरसेवक आक्रमक झाल्याने महापौर वाकळे यांनी याबाबत प्रशासनाकडून माहिती मागविली. यावर प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांनी खुलासा केला. मात्र, त्यांच्या खुलाशाने सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सदस्यांनी कल्याण रोड परिसर महापालिकेतून वगळण्याची मागणी करीत गोंधळ घातला.
...