‘केदारेश्वर’ बिनविरोध !

By Admin | Updated: May 11, 2016 23:59 IST2016-05-11T23:54:19+5:302016-05-11T23:59:55+5:30

शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्व १९ जागांची निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांना यश प्राप्त झाले.

'Kedareshwar' uncontested! | ‘केदारेश्वर’ बिनविरोध !

‘केदारेश्वर’ बिनविरोध !

शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्व १९ जागांची निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांना यश प्राप्त झाले.
केदारेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची बुधवारी (दि. ११) अंतिम मुदत होती. यापूर्वीच बोधेगाव गट (३), हातगाव गट (३), मुंगी गट (३), इतर मागास प्रवर्ग (१) व अनुत्पादक संस्था व पणन (२), अशा एकूण ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित चापडगाव गट, हसनापूर गट व महिला प्रवर्ग प्रत्येकी दोन तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती जमाती अशा आठ जागांसाठी ३१ अर्ज शिल्लक राहिले होते. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत अध्यक्ष अ‍ॅड. ढाकणे यांनी अनेकांची मनधरणी केली. त्यात चापडगाव गटातील दोन जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणच्या इच्छुकांच्या माघारीत त्यांना यश मिळाले. मात्र, इतर दोघा इच्छूकांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे पातकळ व दराडे यांना अर्ज मागे घेण्याची वेळ आली़ त्यांचा ढाकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिरसाठ, बटुळे यांचे डावपेच यशस्वी
चापडगाव गटातील इच्छुक उमेदवारांपैकी भागिनाथ गोरक्षनाथ शिरसाठ (रा. वरखेड) व शेषराव माधव बटुळे (रा. प्रभूवाडगाव) या दोघांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक अधिकाऱ्याकडे आपल्या उपस्थितीशिवाय आमचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येवू नये, अशा आशयाचे लेखी निवेदन दिले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत हे दोघे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे चापडगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव कारभारी पातकळ व सोनेसांगवी येथील सदाशिव हरिभाऊ दराडे या दोघांना बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी माघार घेणे भाग पडले. शिरसाठ, बटुळे यांचे राजकीय डावपेच यशस्वी होऊन त्यांना संचालक मंडळात ऐनवेळी स्थान देण्याची वेळ कारखाना अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यावर आली.
हे आहेत नूतन संचालक
अ‍ॅड. प्रताप बबनराव ढाकणे, भाऊसाहेब दादासाहेब मुंढे, सुरेश विश्वासराव होळकर, विठ्ठल भाऊ अभंग, प्रकाश गंगाधर घनवट, बाळासाहेब फुंदे, श्रीकिसन दादाबा पालवे, बापुराव भानुदास घोडके, श्रीमंत रंगनाथ गव्हाणे, रणजित पांडुरंग घुगे, भागिनाथ शिरसाठ, शेषराव माधव बटुळे, माधव भिवसेन काटे, त्रिंबक दत्तू चेमटे, सुमनबाई मोहन दहिफळे, मिना संदीप बोडखे, सतीश रामराव गव्हाणे, तुषार शिवनाथ वैद्य, सुभाष कचरु खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली़

Web Title: 'Kedareshwar' uncontested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.