काष्टी, श्रीगोंद्यातील दरोडेखोरांना अटक
By Admin | Updated: February 17, 2016 22:42 IST2016-02-17T22:38:37+5:302016-02-17T22:42:25+5:30
श्रीगोंदा : काष्टीतील दरोडाप्रकरणी पोलिसांनी सागर याद्या पवार व श्रीगोंदा शहरात सोन्याचे आमिष दाखवून मंत्रालयातील एका शिपायास लुटल्याप्रकरणी आमनभाई उर्फ निलेश पंडित काळे याला अटक करण्यात आली.

काष्टी, श्रीगोंद्यातील दरोडेखोरांना अटक
श्रीगोंदा : काष्टीतील दरोडाप्रकरणी पोलिसांनी सागर याद्या पवार व श्रीगोंदा शहरात सोन्याचे आमिष दाखवून मंत्रालयातील एका शिपायास लुटल्याप्रकरणी आमनभाई उर्फ निलेश पंडित काळे याला अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी काष्टी, श्रीगोंदा येथे सापळा रचून फरार दरोडेखोरांना पकडण्यात आले. सागर पवार व त्याच्या साथीदारांनी २०१३ मध्ये काष्टी शिवारात दरोडा टाकला होता. तेव्हापासून सागर पवार फरार होता. निलेश काळे याने श्रीगोंदा शहरात मंत्रालयातील एका शिपायास ५० हजारास लुटले होते.
(तालुका प्रतिनिधी)