काष्टी-अजनूज-माळेवाडी रस्ता कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:08+5:302021-07-17T04:18:08+5:30
श्रीगोंदा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेला काष्टी-अजनूज ते माळवाडी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे ...

काष्टी-अजनूज-माळेवाडी रस्ता कामास सुरुवात
श्रीगोंदा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेला काष्टी-अजनूज ते माळवाडी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यासाठी १.४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. जगताप म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याकडे खूप वर्षे मंत्रिपद सत्ता असतानाही रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट होता. तालुक्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नव्हते. मी आमदार असताना रस्त्यांना प्राधान्य दिले व दर्जेदार रस्ते कसे करता येतील यावर भर दिला. सर्व सोयी उपलब्ध करून देणे हे माझे काम आहे व ते मी निरंतर करतच राहणार आहे.
यावेळी बाळासाहेब गिरमकर, राकेश पाचपुते, बापू भुजबळ, नितीन थोरात, योगेश गिरमकर, नाना कणसे, तुकाराम शिपलकर, अमोल गिरमकर, आबा गिरमकर, महेश कवडे, अनिल भुजबळ, महेश गिरमकर, राहुल पाचपुते, राजेंद्र गिरमकर, हनुमंत क्षीरसागर, पद्मसिंह क्षीरसागर, दत्ता गिरमकर, तेजस शिंदे, मच्छींद्र जाधव, भानुदास कवडे, सुदामराव कुटे, अजिनाथ गिरमकर, रमेश गिरमकर, भारत भुजबळ, दीपक गिरमकर उपस्थित होते.