पोलीस बंदोबस्तात कर्जत, करमाळ्याला कुकडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:47+5:302021-05-28T04:16:47+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील कोळगाव येथील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत मोहरवाडी तलावात पाणी सोडले. त्यामुळे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ...

Karjat under police protection, chicken water to Karmalya | पोलीस बंदोबस्तात कर्जत, करमाळ्याला कुकडीचे पाणी

पोलीस बंदोबस्तात कर्जत, करमाळ्याला कुकडीचे पाणी

श्रीगोंदा : तालुक्यातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील कोळगाव येथील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत मोहरवाडी तलावात पाणी सोडले. त्यामुळे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कर्जत, करमाळ्याला कुकडीचे पाणी चालले आहे. कालव्यावर सायंकाळी राज्य राखीव दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले.

कुकडीचे आवर्तन विलंबाने आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. विशेषत: कोळगाव, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, पारगाव या गावांमध्ये पाणीटंचाई आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन पूर्ण करण्यात येणार होते. आवर्तन सुटल्यानंतर पारनेर तालुक्यात चाऱ्या उघडण्यात आल्या. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले. कर्जतला ६५० क्युसेकचा गेज दिला की मोहरवाडी तलावात पाणी सोडू, असे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही.

त्यामुळे कोळगाव येथील शेतकऱ्यांनी कुकडी कालव्यावर ठिय्या दिला. मोहरवाडी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडावे, याबाबत माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या हस्ते मोहरवाडी तलावात पाणी सोडण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच अमित लगड, संतोष लगड, हेमंत नलगे, विश्वास थोरात, नितीन डुबल आदी उपस्थित होते. पंधरा तास पाणी तलावात जाऊ दिले जाणार असून, नंतर ते बंद केले जाणार आहे. पुन्हा कर्जत, करमाळ्याला पाणी गेल्यानंतर पुन्हा तलावात पाणी सोडले जाणार आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कर्जत, करमाळ्याला पाणी सोडले आहे. बंदोबस्तासाठी दौंडहून राज्य राखीव दलाच्या २१ जवानांची तुकडी कालव्यावर तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, सायली नांदे यांच्या पथकाने कोळगाव, लोणी व्यंकनाथ येथील पाणीटंचाईबाबत स्थळपाहणी केली.

---

बेलवंडीकरांचे आज उपोषण

बेलवंडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हंगा नदीत कुकडीचे पाणी सोडून टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी सरपंच सुप्रिया पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २८) भैरवनाथ मंदिरात उपोषण करण्यात येणार आहे.

-----

२७ श्रीगोंदा कुकडी

कोळगाव येथे कुकडी कालव्याचे पाणी मोहरवाडी तलावात सोडताना शेतकरी, कार्यकर्ते.

Web Title: Karjat under police protection, chicken water to Karmalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.