स्वच्छता अभियानासाठी कर्जत-पंढरपूर सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:26+5:302021-02-05T06:34:26+5:30

कर्जत : येथील स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेले नागरिक, संघटनांनी कर्जत ते पंढरपूर अशी सायकल यात्रा आयोजित केली होती. स्वच्छता ...

Karjat-Pandharpur Cycle Wari for Sanitation Campaign | स्वच्छता अभियानासाठी कर्जत-पंढरपूर सायकल वारी

स्वच्छता अभियानासाठी कर्जत-पंढरपूर सायकल वारी

कर्जत : येथील स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेले नागरिक, संघटनांनी कर्जत ते पंढरपूर अशी सायकल यात्रा आयोजित केली होती. स्वच्छता अभियानात देशात कर्जतला प्रथम क्रमांक मिळू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले.

नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या दोन्ही स्पर्धांत सहभाग घेतला आहे. सर्वच कर्जतकरांनी हे अभियान हाती घेतले आहे. गेल्या चार महिन्यांपासून अविरतपणे शहर व उपनगरात स्वच्छता अभियान सुरू आहे. येथील स्वच्छताप्रेमींनी सायकल क्लबची स्थापना केली आहे. स्वच्छता अभियान सुरू करण्यापूर्वी हे सर्वजण रोज वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग करतात. यामधूनच कर्जत ते पंढरपूर अशी सायकल वारी करण्याची संकल्पना पुढे आली. शनिवारी पहाटे ही सायकल वारी पंढरीकडे जाण्यासाठी निघाली. मजल दर मजल करीत रस्त्याने चहा, नाष्टा, जेवण स्वीकारत ते पंढरीत पोहोचले. तेथे नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी स्वच्छताप्रेमींचा सन्मान केला. यानंतर पंढरपूर येथील विठुरायाच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणात व माझी वसुंधरा या स्पर्धेत कर्जतचा पहिला नंबर येऊ दे असे साकडे विठुरायाला घातले.

सायकल रॅलीत सहभागी झालेले स्वच्छतादूत असे : मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगरसेवक अक्षय राऊत, समन्वयक नितीन देशमुख, अतुल कुलथे, राहुल नवले, घनश्याम नाळे, आशिष शेटे, सुनील भोसले, सत्यजित मच्छिंद्र, गिरीश गुंड, दीपक माने, तात्यासाहेब क्षीरसागर, सुमित राऊत, गणेश सातव, विशाल तोरडमल, माउली थोरात, प्रदीप कळसाईत, प्रतीक राऊत, आदी सहभागी झाले होते.

(फोटो ०१ कर्जत सायकल)

स्वच्छताप्रेमींनी कर्जत-पंढरपूर अशी सायकल वारी पूर्ण केली. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर स्वच्छतादूतांचे घेतलेले छायाचित्र.

Web Title: Karjat-Pandharpur Cycle Wari for Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.