कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसकडेच
By Admin | Updated: August 17, 2014 23:33 IST2014-08-17T22:48:33+5:302014-08-17T23:33:02+5:30
कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही, येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसकडेच
कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही, येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.
कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथे निवासस्थानी भेटले. यावेळी मतदारसंघ व इतर प्रश्नावर अर्धा तास चर्चा झाली. कर्जत-जामखेड हा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे व तो तसाच राहणार आहे.
राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे, असे स्पष्ट करून मतदारसंघ फेरबदलाचा प्रश्न त्यांनी संपवला. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
या शिष्टमंडळात विनायकराव देशमुख, अॅड.माणिकराव मोरे, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील, जामखेडचे सरपंच कैलास माने, शरद कार्ले, रमेश आजबे, समीर शेख आदींचा समावेश होता.
(तालुका प्रतिनिधी)