कर्जत विभाग जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:33+5:302021-01-08T05:06:33+5:30
कर्जत : कर्जत पोलीस उपविभागात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा पोलीस अधीक्षक ...

कर्जत विभाग जिल्ह्यात अव्वल
कर्जत : कर्जत पोलीस उपविभागात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. पोलीस दलाच्यावतीने अपहरण आणि हरवलेल्या बालक, महिला, मुली आणि पुरुष यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. या मोहिमेत डिसेंबर २०२० अंतर्गत कर्जत उपविभागातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्यात या अनुषंगाने पथके नेमण्यात येऊन उपविभागात २० अपहरणाचे गुन्हे दाखल होते. पैकी १० अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास पथकाला यश आले, तसेच महिला हरवलेली १७१ प्रकरणे प्रलंबित होती. पैकी ८४ महिलांचा शोध घेण्यात पथकाला यश आले. हरवलेल्या पुरुषांची १६२ प्रकरणे दाखल होती. त्यापैकी मुस्कान ऑपरेशन अंतर्गत ७५जणांचा शोध घेण्यात आला.