अहमदनगर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:35+5:302021-07-28T04:21:35+5:30

अहमदनगर महाविद्यालयाच्या आवारात प्रतीकात्मक अमर जवान विजय स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. कर्नल झेंडे व प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांनी अमर ...

Kargil Victory Day celebrated at Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

अहमदनगर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

अहमदनगर महाविद्यालयाच्या आवारात प्रतीकात्मक अमर जवान विजय स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. कर्नल झेंडे व प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांनी अमर जवान स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. अहमदनगर महाविद्यालय एनसीसी युनिटच्या वतीने कॅडेट्सकडून शहिदांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता १७ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार कुंदन सकलानी, नायब सुभेदार सुशील चंद्रा, हवालदार चंदर, हवालदार दिनेश आणि बीएचएम लुईस यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदविला. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिन सोहळ्यात सहभाग नोंदविला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद नागवडे, उपप्राचार्य डॉ. रझाक सय्यद, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र प्रमुख डॉ. नंदकुमार सोमवंशी, एनएसएस कार्यक्रम अधिकारी अशोक घोरपडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. भागवत परकाळ उपस्थित होते.

या प्रसंगी शहिदांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट डॉ. माधव जाधव यांनी केले, तर आभार आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी केले.

----------

फोटो - २७नगर कॅालेज

अहमदनगर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रजनीश बार्नबस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

Web Title: Kargil Victory Day celebrated at Ahmednagar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.