कारभारी उगले, सूर्यकांत शिंदे यांना परिवर्तन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:00+5:302021-03-05T04:21:00+5:30
डॉ. सोमनाथ मुटकुळे व चिकणी येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप व संजय मुटकुळे यांच्या मातोश्री चंद्रभागा मुटकुळे यांच्या स्मरणार्थ ...

कारभारी उगले, सूर्यकांत शिंदे यांना परिवर्तन पुरस्कार
डॉ. सोमनाथ मुटकुळे व चिकणी येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप व संजय मुटकुळे यांच्या मातोश्री चंद्रभागा मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी विडी कामगार चळवळीसाठी अखंड आयुष्य समर्पित भावनेने काम करणारे व समाजातील विविध चळवळींसाठी सातत्याने भूमिका घेणारे कॉम्रेड कारभारी उगले यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर नाट्य चळवळीच्या माध्यमातून जागविण्यासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणारे सूर्यकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. चिकणी येथील भारती बाबा विद्यालयात मुलींमध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीला गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी विद्यालयात हर्षदा दत्तात्रय वर्पे हिची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार समिती अध्यक्ष म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, संदीप वाकचौरे, माधवी देशमुख, शिवानी मुटकुळे, दीप्ती घुले यांचा समावेश आहे.