करंजी ग्रामपंचायतीची वाटचाल विकासाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:40+5:302021-07-25T04:18:40+5:30
कोपरगाव : करंजी ग्रामपंचायतीने गावच्या विकासात मोठी घोडदौड घेतली असून येथील नेतृत्व रहिवाशांच्या सोईसुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. कोरोना ...

करंजी ग्रामपंचायतीची वाटचाल विकासाकडे
कोपरगाव : करंजी ग्रामपंचायतीने गावच्या विकासात मोठी घोडदौड घेतली असून येथील नेतृत्व रहिवाशांच्या सोईसुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. कोरोना काळात गावातील सर्वच घटकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी म्हटले यांनी केले.
करंजी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून घेतलेल्या घंटागाडीचे शनिवारी (दि.२४ ) विवेक कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी उपसरपंच रवींद्र आगवण यांनी करंजी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन कोरोना काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा देत, आत्मा मालिक संजीवनी कोविड व डेडिकेटेड सेंटर मार्फत उपलब्ध आरोग्य सुविधांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगितले. सरपंच छबूनाना आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी माजी उपसभापती नवनाथ आगवण, संतोष भिंगारे, डॉ. सुनील देसाई, डॉ. विलास सोनवणे, चंद्रकांत पवार, अनिल डोखे, बाळासाहेब भिंगारे, सोमनाथ पाफाळे, शिवाजी करंजकर, माजी सरपंच लक्ष्मण शेळके, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड, नारायण भारती, मच्छिंद्र भिंगारे, अजय भिंगारे, बाळनाथ जोरवर, रवींद्र पोळ, देविदास भिंगारे, शिवसेनेचे शिवाजी जाधव, अरुण भिंगारे, विकास शिंदे उपस्थित होते. करंजी गावातील अंगणवाडी सेविका, वायरमन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपअभियंते, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, आशा सेविका, अधिकारी व कोविड योद्धयांचा कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी देविदास भिंगारे यांनी आभार मानले.
.....
फोटो २४ - करंजी