कांचन येवले हिस विद्यापीठाचे सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:12 IST2020-01-10T12:11:18+5:302020-01-10T12:12:52+5:30
सवित्रीबाई फुले पणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. ए.मराठी परीक्षेत नगर येथील राधाबाई काळे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन विवेक येवले हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले.

कांचन येवले हिस विद्यापीठाचे सुवर्णपदक
अहमदनगर : सवित्रीबाई फुले पणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. ए.मराठी परीक्षेत नगर येथील राधाबाई काळे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन विवेक येवले हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले.
प्रभारी कुलगुरू डॉ.एन. एस. उमराणी, व प्रा. डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते पुणे येथे पदवीदान समारंभात कांचन येवले हिचा गौरव करण्यात आला. कांचन हिस एम. एन. अदवंत स्मृती सुवर्णपदक, बळवंत शहादेव तिकडे सुवर्णपदक, प्रमिला दत्तात्रय अलगावकर सुवर्णपदक मिळाले आहे. कांचन ही पोलीस दलातील सेवानिवृत्त सीआयडी आॅफिसर गंगाधर काकडे यांची नात आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.