कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:16 IST2018-06-26T16:16:30+5:302018-06-26T16:16:37+5:30
तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर एस.टी बस आणि कारचा भिषण अपघात, पती -पत्नी ठार
पारनेर : तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरम्यान एस.टी. बस व कार यांच्या भीषण झाला. या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, भाळवणीपासून एक किमी अंतरावर कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव फाट्याजवळ माळकुप शिवारात नगरहून कल्याणकडे जात असलेल्या गेवराई-भिवंडी एस.टी. बस (क्रमांक एम.एच. २० बी.एल. ३०६६) आणि कल्याणहून नगरकडे जात असलेल्या (एम.एच. १६, बी.एच. ७७४३) या कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पंकज शहा व त्यांची पत्नी रुपाली शहा यांचा जागीच मृत्यू झाला. शहा यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णा चव्हाण, शेख, गायकवाड यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.