कालिदास बनकर एलआयसीचा पुरस्कार
By | Updated: December 5, 2020 04:39 IST2020-12-05T04:39:11+5:302020-12-05T04:39:11+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विमा प्रतिनिधी कालिदास ज्ञानदेव बनकर यांची करोडपती विमाप्रतिनिधी म्हणून निवड झाली. भारतीय ...

कालिदास बनकर एलआयसीचा पुरस्कार
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विमा प्रतिनिधी कालिदास ज्ञानदेव बनकर यांची करोडपती विमाप्रतिनिधी म्हणून निवड झाली. भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कालिदास बनकर यांना प्राप्त झाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात पहिल्याच वर्षी हा पुरस्कार प्राप्त करून नवीन विक्रम केला आहे. मिलियन डॉलर राऊंड टेबल सदस्यपदी निवड होऊन अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांनी एमबीए मार्केटिंग करून विमा क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट काम करून यश मिळविले. विकास अधिकारी आर. व्ही. हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०४ कालिदास बनकर