बस सुरू; शिवबा, प्रहारच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:56+5:302021-03-15T04:20:56+5:30
निघोज : कोरोेनामुळे बससेवा बंद असल्याने पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत होते. यासंदर्भात ...

बस सुरू; शिवबा, प्रहारच्या प्रयत्नांना यश
निघोज : कोरोेनामुळे बससेवा बंद असल्याने पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत होते. यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते. शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पारनेर आगार प्रशासनास यासंदर्भात निवेदन देऊन कोणत्याही क्षणी आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने तत्काळ दखल घेत बससेवा सुरू केली. त्याबद्दल प्रभारी व्यवस्थापक एस. करपे यांचे शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांनी आभार मानले. प्रहार जिल्हाप्रमुख विनोद परदेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित पाटील, सभापती प्रशांत गायकवाड, विश्वनाथ कोरडे आदींसह शिवबा, प्रहारच्या पदधिकारी, कार्यकर्त्यांनी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.