शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 10:21 IST

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती.

अहमदनगर - देशात आज स्वातंत्र्याचा ७६ दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्याहस्ते लाल किल्ल्यावर सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहन झाल्यानंतर देशातील सर्वच शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या मेरी माटी मेरा देश उपक्रमही याच काळात रावबिण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहीदांना अभिवादन करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका कार्यक्रमात चिमुकलीने देशभक्तीपर गाणं गायलं अन् स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. 

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या समारोपावेळी समृध्दी दिपक त्रिभुवन हिने देशभक्तीपर गीत गायलं. गीताचे बोल ऐकून वीर पत्नींचा डोळ्यात अश्रू तरळले.

ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पाणीजो शहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी

समृद्धीने हे लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं व्यासपीठावरुन म्हणायला सुरुवात केली. जब देश मे थी दिवाली, ओ खेल रहे थे गोली... हे शब्द लहानग्या विद्यार्थीनीकडून गायले जात असताना व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित राहिलेल्या वीरपत्नी-वीरमातांना अश्रू अनावर झाल्या. गाण्याचे बोल ऐकून देशासाठी सीमारेषेवर शहीद झालेल्या पती, मुलाची आठवण त्यांना झाली. यावेळी, कार्यक्रमास्थळी वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन समोर आला आहे. व्हिडिओ पाहूनही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. दरम्यान, कवि प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं होतं, जे लता मंगेशकर यांनी गायलं. तर, सी. रामचंद्र यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनMartyrशहीदSocial Viralसोशल व्हायरल