जामखेड, खर्डा शहरात कडकडीत बंद
By Admin | Updated: August 31, 2016 00:33 IST2016-08-31T00:28:23+5:302016-08-31T00:33:44+5:30
जामखेड/खर्डा: जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडसह खर्डा व इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

जामखेड, खर्डा शहरात कडकडीत बंद
जामखेड/खर्डा: जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडसह खर्डा व इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
मंगळवारी कडकडीत बंद पाळून जामखेडकरांनी घटनेचा निषेध नोंदविला. तहसील कार्यालया समोरील निषेध सभेत भाजप कार्यकर्त्यांनी निरपराध कार्यकर्त्यांची नावे वगळण्याची मागणी केली. सभापती डॉ. मुरूमकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपने जामखेड शहरसह तालुका बंदचे आवाहन केले होते.
त्यानुसार एस. टी. बस स्थानकापासून भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. व्यापारी, उद्योजक, छोटे मोठे व्यावसायिक यांना बंदचे आवाहन करून तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी विरोधकांनी खोटे गुन्हे दाखल करून भाजप कार्यकर्त्यांना टार्गेट केल्याचा आरोप केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
(तालुका प्रतिनिधी)
जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या खर्डा बंदला मंगळवारी प्रतिसाद मिळाला.
४भाजप शहराध्यक्ष संजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शिवकुमार गुळवे, उपसरपंच भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य संजय गोपाळघरे, बापूसाहेब ढगे, विकास शिंदे, नितीन सुरवसे, बबलू सुरवसे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या बंदला ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आपले दुकाने बंद ठेऊन सहभाग नोंदविला. पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग पाहता दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून आपले व्यवहार सुरळीत करण्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे दुपारनंतर खर्डा शहरातील दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याची खरेदी करणे शक्य झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाजप कार्यकर्त्यांनी जामखेडच्या तहसीलदारांना निवेदन निषेध नोंदविला.