मुख्यमंत्रीपदावरून रंगली महाराजांमध्ये जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 05:58 IST2018-09-09T05:58:18+5:302018-09-09T05:58:20+5:30

मुख्यमंत्री बीडचा की नागपूरचा करायचा, यावरून एका आध्यात्मिक कार्यक्रमात महाराजांची जुगलबंदी रंगली.

Jugalbandi in Rangliji Maharaj from the Chief Minister's post | मुख्यमंत्रीपदावरून रंगली महाराजांमध्ये जुगलबंदी

मुख्यमंत्रीपदावरून रंगली महाराजांमध्ये जुगलबंदी

पारनेर (जि. अहमदनगर) : मुख्यमंत्री बीडचा की नागपूरचा करायचा, यावरून एका आध्यात्मिक कार्यक्रमात महाराजांची जुगलबंदी रंगली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘जनता जनार्दन मला योग्य वेळी मुख्यमंत्री पदावर बसवेल’, असे सांगून महाराजांची विकेट घेतली.
निघोज येथे ढोक महाराज यांचा गौरव सोहळा झाला. ‘पंकजा मुंडे या आमच्या बीड जिल्ह्याच्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे’, असे आशीर्वाद समाधान महाराज शर्मा यांनी दिले. त्यावर ‘मी नागपूरचा आहे. आमच्या फडणवीसांनी काय करायचे, असा सवाल ढोक महाराजांनी मिश्किलपणे केला, त्यावर हास्यकल्लोळ उडाला. ‘पंकजातार्इंमध्ये योग्यता आल्यावर त्यांना संधी मिळेल, अशीही पुष्टीही ढोक महाराज यांनी जाता-जाता जोडली.

Web Title: Jugalbandi in Rangliji Maharaj from the Chief Minister's post