पारनेरमध्ये विजय औटी-नीलेश लंके यांच्यात जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:52+5:302021-07-14T04:24:52+5:30
पारनेर : गेल्या सत्तर वर्षांपासून वंचित असलेल्या धोत्रे गावासाठी मी अडीच कोटींचा रस्ता दिला आहे. उद्या येथे कोणी येईल, ...

पारनेरमध्ये विजय औटी-नीलेश लंके यांच्यात जुगलबंदी
पारनेर : गेल्या सत्तर वर्षांपासून वंचित असलेल्या धोत्रे गावासाठी मी अडीच कोटींचा रस्ता दिला आहे. उद्या येथे कोणी येईल, चार दोन जण सोडून दिले जातील. ‘पाहतोच रस्ता कसा होतो ते?’ असेही बोलले जाईल. कामात कोणी खो घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, अशी टीका माजी आमदार विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली.
धोत्रे (ता.पारनेर) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. जि.प.च्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीच्या सदस्या ताराबाई चौधरी, धोत्रे गावच्या सरपंच वनिता कसबे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, सोसायटी अध्यक्ष हारकू भिटे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर भांड, दीपक भागवत, सुभाष ठाणगे, बाबासाहेब नऱ्हे, रभाजी भांड आदी उपस्थित होते.
औटी म्हणाले, माझे वय ६५ वर्षांचे आहे. १५ वर्षे विधानसभेत मी महाराष्ट्राचे राजकारण पाहिलेले आहे. विधानसभेत मी मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण केलेेली होती. तालुक्याची एक उंची होती.
----
मी आता उमेदवार नाही..
मी यापुढे कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार नाही. मी आहे त्यात आनंदी आहे. शिवसेनेतील नेत्यांमध्ये आता कोण पुढारपण करेल ते काळ ठरवेल, असेही औटी यांनी सांगितले.