न्यायालयीन कोठडीतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST2021-02-24T04:22:50+5:302021-02-24T04:22:50+5:30

श्रीरामपूर : येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिघा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

In judicial custody | न्यायालयीन कोठडीतील

न्यायालयीन कोठडीतील

श्रीरामपूर : येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिघा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या बराकीत हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे रात्री आलेल्या जेवणात भाजी घेण्यावरून तीन कैद्यांनी एका जणाशी हुज्जत घातली. त्याला पाणी पिण्याच्या भांड्याने मारहाण केली. तिघा जणांच्या आधी जेवण घेतल्याने आलेल्या रागातून हा प्रकार घडला.

याप्रकरणी जखमी संदीप कांबळे याच्या फिर्यादीवरून अक्षय गांगुर्डे, किरण चिकणे, सधीर सरकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे तपास करत आहेत. फिर्यादी व आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यातील एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: In judicial custody