पत्रकार, प्रशासनाच्या समन्वयातून समस्यांचे निराकण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:20+5:302021-01-08T05:05:20+5:30
अहमदनगर : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनता आणि प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा आहे. प्रशासन आणि पत्रकार यांचा समन्वय ...

पत्रकार, प्रशासनाच्या समन्वयातून समस्यांचे निराकण
अहमदनगर : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनता आणि प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा आहे. प्रशासन आणि पत्रकार यांचा समन्वय चांगला असेल तर अनेक समस्यांचे निराकरण होते, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिन व पत्रकारांसाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीर सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी भोसले बोलत होते.
शहरातील मॅककेअर हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, रोटरी क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश सोनवणे, डॉ. माजिद, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. मदन काशिद, डॉ. विनोद मोरे, उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, सदस्य अशोक झोटिंग, निशांत दातीर, जयंत कुलकर्णी, खजिनदार ज्ञानेश दुधाडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशचे अध्यक्ष उमेर सय्यद, सचिव लैलेश बारगजे तसेच प्रेस फोटोग्राफर व पत्रकार उपस्थित होते.
भोसले म्हणाले, रोटरी क्लब व प्रेस क्लबने आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करीत राज्यात दिशादर्शक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून आगामी काळात अनेक पत्रकारांना फायदा होईल. पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळातही पत्रकार, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, पोलीस अशा सर्वांनी जनतेला दिलासा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. या काळात अनेकांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आरोग्याच्या दृृष्टीने हे शिबीर महत्त्वाचे आहे.
रोटरी क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे म्हणाले, पत्रकार दिनानिमित्त आयोजित शिबीर सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकाराची साधारणपणे १७ हजार रुपयांची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. भविष्यात पत्रकार व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
क्लबचे अध्यक्ष शिर्के यांनी वर्षभरात क्लबच्या वतीने पत्रकरांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच पत्रकारांसाठी ६ ते १३ जानेवारी या काळात शहरातील विविध रुग्णालयांत तपासण्या केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. काशिद यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मॅककेअर हॉस्पिटच्या कार्डिया ॲम्ब्युलन्सचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन अरुण वाघमोडे यांनी केले तर रोटरीचे क्लबचे सचिव दिगंबर रोकडे यांनी आभार मानले.
०६ पत्रकार दिन
ओळी - नगर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. समवेत आ. संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, निशांत दातीर आदी.