लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पत्रकारांचा समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST2020-12-17T04:44:58+5:302020-12-17T04:44:58+5:30
कोल्हे म्हणाल्या, कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी सुरु आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक ...

लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पत्रकारांचा समावेश करावा
कोल्हे म्हणाल्या, कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी सुरु आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्याचे टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीत रात्रदिवस काम केलेले आहे. जबाबदारी घेवुन काम करत असताना काही पत्रकारांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही पत्रकार आजही कोरोना बाधित आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून आजही काम करत आहेत.
यावेळी मनिष जाधव, जनार्दन जगताप, विनोद जवरे, हाफीज शेख, स्वप्नील कोपरे, विजय कापसे, राजेंद्र जाधव, अक्षय काळे, शिवाजी जाधव, लक्ष्मण जावळे, फकिरा टेके, रविंद्र जगताप, योगेश गायके, अमोल गायकवाड, संदीप विदुर, सुमित थोरात, गणेश कांबळे, गहिनाथ घुले, समाधान भुजाडे, रविंद्र साबळे, मधुकर वक्ते, योगश रुईकर, अनिल दिक्षीत, सोमनाथ डफळ उपस्थित होते.