पत्रकार मारहाण प्रकरण : पारनेर बंद : पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:03 IST2019-03-21T12:03:01+5:302019-03-21T12:03:01+5:30
राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली.

पत्रकार मारहाण प्रकरण : पारनेर बंद : पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन
पारनेर : राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद कालपासूनच जिल्हाभर उमटू लागले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ पारनेरमध्येही बंद पाळण्यात आला आहे. पारनेर पत्रकार संघाच्या वतीने पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला. वृत्तांकन करणा-या पत्रकाराला मारहाण करणे हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्यू असून या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पत्रकार संजय वाघमारे, देविदास अवधूत, भगवान गायकवाड, लतिफ राजे, निलेश जाधव, शरद झावरे,अजित दीनवळ, संपत कपाळे, भिकाजी धुमाळ, दादा भालेकर, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनोद गोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.