पत्रकार मारहाण प्रकरण : सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:11 IST2019-03-21T13:01:49+5:302019-03-21T13:11:26+5:30
राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पत्रकार मारहाण प्रकरण : सहा जणांना अटक
अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय उर्फ विजू रामदास आहेर (वय २५, रा. एकलव्य वसाहत, राहुरी), अक्षय भास्कर बर्डे (वय १९, रा. बालाजी मंदीर, जुन्या बसस्थानकाजवळ, राहुरी), अमोल उत्तम माळी (वय-२४, जुनी भिलाटी, राहुरी), प्रवीण रावसाहेब वाघ (वय-२२ जुनी भिलाटी, राहुरी), रामा रमेश माळी (वय-३३, रा. एकलव्य वसाहत, राहुरी), आकाश सोमनाथ माळी (वय-१९, काटेवाडी, तमनर आखाडा,राहुरी) यांचा समावेश आहे.
भाऊसाहेब येवले हे व्यवसायाने पत्रकार असून बुधवारी राहुरीतील पृथ्वी कॉर्नर येथे त्यांना गर्दी दिसली. म्हणून ते मोबाईल मध्ये सदर घटनेचे फोटो घेत असताना आरोपींनी येवले यांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतला. येवले यांना काठीने व लाथाबुक्कयाने मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात येवले यांच्या फियार्दीवरून आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.