‘संजीवनी’च्या १४ विद्यार्थ्यांना नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:24+5:302021-01-17T04:18:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : उद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संजीवनी एम.बी.ए.ने अभ्यासक्रम रचना केलेली आहे. त्यामुळे ...

Jobs for 14 students of 'Sanjeevani' | ‘संजीवनी’च्या १४ विद्यार्थ्यांना नोकरी

‘संजीवनी’च्या १४ विद्यार्थ्यांना नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : उद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संजीवनी एम.बी.ए.ने अभ्यासक्रम रचना केलेली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ओम लाॅजिस्टिक्स व माट्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपन्यांनी एकूण १४ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी एम.बी.ए.ला २०१९ मध्ये ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त झाला आहे. २०२१ मध्ये ऑटोनॉमसअंतर्गत शिक्षण घेत असलेली बॅच बाहेर पडत आहे. संजीवनी एम.बी.ए.नेे ओमलाजिस्टिक्स या कंपनीबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. या कंपनीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी १०० तासांचा अधिकचा अभ्यासक्रम शिकविला जातो. या कंपनीने प्रशिक्षण कालावधीत साडेतीन लाखांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जयेश सोमवंशी, सागर पाचोरे, आकाश गरुड, रोहित आवारे, निखिल देवरे, स्वप्नील राजपूत, नानासाहेब पाईक, ऋषिकेश खैरनार, स्वप्नील बारहाते, अभिषेक पवार व अविनाश पवार यांचा समावेश आहे, तर माट्रिक्स स्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीने अस्मिता हिवाळे, मयूर वाघ व मानसी ठाकरे यांची ३ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी, पालक यांच्यासह प्राचार्य डाॅ. ए.जी. ठाकूर व विभागप्रमुख डाॅ. विनोद मालकर यांचे कौतुक केले आहे. (वा.प्र.)

.............

फोटो १६- अमित कोल्हे

160121\amitdada photo.jpg

फोटो १६- अमित कोल्हे, कोपरगाव  

Web Title: Jobs for 14 students of 'Sanjeevani'