मंदिरातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:40:41+5:302014-09-02T23:58:40+5:30
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले.

मंदिरातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद
अहमदनगर : डॉन बॉस्को चर्च शेजारी असलेल्या पाचम्मा मंदिरातील १६ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्यानंतर सहा तासांमध्येच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील मंदिरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पाचम्मा मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील बेंटेक्सचे दागिने, हार, मंदिरातील लोखंडी घंटा, समई आदी १६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. ही घटना रविवार सायंकाळी ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मंदिराचे पुजारी नारायण माधवराव पुप्पाल (रा. सरस्वती कॉलनी, चाँदणी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याच सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. पोलिसांनी दोघा संशयितांना हटकले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मंदिरातील साहित्य आढळून आले. त्यामध्ये चार पितळी घंटा, चार समई, कासवाच्या दोन प्रतिमा, दोन पावले, बेन्टेक्सचे हार असे साहित्य आढळून आले. त्यांनी हे साहित्य पाचम्मा देवीच्या मंदिरातून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. जावेद इस्माईल शेख (वय २२, रा. बाबा बंगाली चौक, नगर) आणि अरिफ अल्लाउद्दिन शेख (वय ४२, इंदिरानगर, कोठी) यांना अटक करून गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, मधुकर शिंदे, प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवे, उमेश खेडकर, विशाल अमृते, दिगंबर कारखिले यांच्या पथकाने ही कारवाई केली.