मच्छिंद्र देशमुख यांना ‘जीवनदीप गौरव पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:53+5:302021-06-26T04:15:53+5:30

गोवेली येथे महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते प्रा. देशमुख यांना या पुरस्काराने ...

Jeevandeep Gaurav Award to Machhindra Deshmukh | मच्छिंद्र देशमुख यांना ‘जीवनदीप गौरव पुरस्कार’

मच्छिंद्र देशमुख यांना ‘जीवनदीप गौरव पुरस्कार’

गोवेली येथे महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते प्रा. देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील, जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, विश्वस्त प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. के. बी. कोरे आदी यावेळी उपस्थित होते.

साकिब गोरे (सामाजिक), प्राचार्या अपर्णा देशमुख (शैक्षणिक), विलास सुरोसे (आर्दश शेतकरी), डॉ. मंगल पवार (वैद्यकीय), राजू. डी. वंजारी (पोलीस दल), तहसीलदार दीपक आकडे (महसूल), संजय फुलसुंदर (सहकार) यांना देखील ते कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जीवनदीप गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे पत्रकार प्रा. देशमुख यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

......फोटो नेम : २५ देशमुख पुरस्कार,

ओळ : आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पत्रकार प्रा. मच्छिंद्र देशमुख यांना जीवनदीप गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Jeevandeep Gaurav Award to Machhindra Deshmukh