‘जेसीबी’चालकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:49+5:302021-03-05T04:20:49+5:30
श्रीरामपूर : इंधन दरवाढीमुळे जेसीबीचालकांनी पुकारलेला संप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आला. जेसीबी व्यावसायिकांनी इंधन ...

‘जेसीबी’चालकांनी
श्रीरामपूर : इंधन दरवाढीमुळे जेसीबीचालकांनी पुकारलेला संप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आला.
जेसीबी व्यावसायिकांनी इंधन दरवाढीमुळे पूर्वीच्या दरामध्ये कामे करणे परवडत नसल्याचे सांगत संप पुकारला होता. येथील हरेगाव फाटा येथे जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी आपली यंत्रे उभी केली होती. त्यामुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यावसायिकांची भेट घेत हा प्रश्न समजून घेतला. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.
मुरकुटे यांनी चर्चा एक हजार १०० रुपये प्रती तासाप्रमाणे जेसीबी चालकांनी काम करावे, असा उपाय सूचविला. तो मान्य करण्यात आला. यावेळी अमोल कालंगडे, बाळासाहेब बकाल, मनोज गवारे, विक्रम गलांटे, संकेत संचेती, मनोज दिघे, सतीश बोंबले, अमोल कलांगडे, त्यांच्या समवेत बाळासाहेब बकाल, मनोज गवारे, संकेत संचेती, मनोज दिवे, सतीश टेकाळे, काका बढे, अमोल बोंबले आदी उपस्थित होते.
------------