जवखेडे हत्याकांड: ओढ्यातून काढले मयतांचे कपडे, पंचाची साक्ष पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:38 IST2017-12-20T19:34:17+5:302017-12-20T19:38:35+5:30
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले.

जवखेडे हत्याकांड: ओढ्यातून काढले मयतांचे कपडे, पंचाची साक्ष पूर्ण
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले.
जवखेडे खालसा हत्याकांडाची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी कोतवाल रमेश बर्डे यांची साक्ष झाली. आरोपी अशोक जाधव पोलीस कोठडीत असताना त्याने पोलिसांना सांगितले होती की, जवखेडे येथे तिघांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यारे व त्यांचे कपडे मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यात फेकून दिले. पोलीस आरोपीला घेऊन ओढ्याच्या ठिकाणी गेले तेव्हा बर्डे हे पंच साक्षीदार म्हणून उपस्थित होते़ बर्डे यांनी ओढ्यातून काढलेल्या कपड्यांबाबत न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी साक्षीदाराची सरतपासणी घेतली. सरतपासणी झाल्यानंतर आरोपी पक्षाच्यावतीने उलटतपासणी घेण्यात आली. दरम्यान या खटल्यात आतापर्यंत १९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.