रुईछत्तीसीच्या जनता विद्यालयाला ‘ब’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:48+5:302021-09-14T04:25:48+5:30
रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील जनता कला, विज्ञान महाविद्यालयाला बंगळुरू येथील मूल्यांकन संस्थेने नुकतीच ‘ब’ श्रेणी दिली. त्यानिमित्त ...

रुईछत्तीसीच्या जनता विद्यालयाला ‘ब’ श्रेणी
रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील जनता कला, विज्ञान महाविद्यालयाला बंगळुरू येथील मूल्यांकन संस्थेने नुकतीच ‘ब’ श्रेणी दिली. त्यानिमित्त जिल्हा मराठा संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे व खजिनदार मुकेश मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाने अतिशय कमी कालावधीत यश संपादन केले आहे. शहराच्या ठिकाणी मिळत असणाऱ्या सोयी-सुविधा ग्रामीण भागात या विद्यालयात उपलब्ध आहेत, असे मत प्राचार्य सुरेश बाबर यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब दरंदले, उपसरपंच विशाल भांबरे, श्रीकांत जगदाळे, बिभीषण सपाटे, सरपंच, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक वर्ग उपस्थित होते. प्रा. राजेंद्र गोरे यांनी सूत्रसंचालन, प्रा. सुपेकर यांनी आभार मानले.