जामखेड तालुका हागणदारीमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:42 IST2016-08-24T00:15:35+5:302016-08-24T00:42:53+5:30
जामखेड : जामखेड तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राम शिंदे व मी बरोबर आहोत,

जामखेड तालुका हागणदारीमुक्त करणार
जामखेड : जामखेड तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राम शिंदे व मी बरोबर आहोत, असे खासदार दिलीप गांधी यांनी येथे सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल १५ आॅगस्टपासून सुरू झालेल्या तिरंगा यात्रेचे सोमवारी जामखेड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. वाजत गाजत ही यात्रा जामखेड शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे,तालुुकाध्यक्ष रवी सुरसे, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, मुकुंद गर्जे, श्रीकांत साठे, अमोल गर्जे, सलीम बागवान, ज्ञानेश्वर झेंडे, कार्यकर्ते हजर होते.
खा. गांधी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारोंनी आपले बलिदान दिले. देशाच्या सीमांचे जे सैनिक डोळ्यात तेल घालून रक्षण करून आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून तसेच तिरंगा ध्वजाखाली सर्व जनता आणण्यासाठी या तिरंगा यात्रेचे नियोजन केले आहे. दोन वर्षात सत्तर विविध विकास योजना सुरु केल्या आहेत. यातील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही जगातील सर्वात उत्कृष्ठ विमा योजना आहे. ही तिरंगा यात्रा जामखेड शहर, राजुरी, खर्डा, सातेफळ, सोनेगाव, जवळके, नान्नज, जवळा, हळगाव, चोंडी, फक्राबाद, पिंपरखेड, चापडगाव मार्गे कर्जत तालुक्यात रवाना झाली. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)