जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड यांची भाजपात घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:13 IST2019-09-28T18:11:14+5:302019-09-28T18:13:36+5:30
चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करीत घरवापसी केली.

जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड यांची भाजपात घरवापसी
जामखेड : चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करीत घरवापसी केली.
आव्हाड यांच्या घरवापसीमुळे भाजप पुन्हा जोमात आली आहे. २३ सप्टेंबर रोजी कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी सभापती सुभाष आव्हाड यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चार दिवसानंतर सुभाष आव्हाड यांनी शेगुड येथील पालकमंत्र्यांच्या सभेत भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेड नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, पणन संचालक डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजय काशीद व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला.