जामखेडमध्ये वीज पडून एक ठार; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 15:33 IST2017-10-15T15:31:30+5:302017-10-15T15:33:11+5:30

जामखेड : जामखेड तालुक्यातील सातेफळ, तरडगाव, खुरदैठण येथे वीज पडून एकजण ठार, तर दोेघेजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नगरला हलविण्यात आले आहे. तसेच वीज पडून तीन बैल, एक म्हैस, पाच शेळ्या दगावल्या. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

Jamkhed dies in electricity; Both injured | जामखेडमध्ये वीज पडून एक ठार; दोघे जखमी

जामखेडमध्ये वीज पडून एक ठार; दोघे जखमी

जामखेड : जामखेड तालुक्यातील सातेफळ, तरडगाव, खुरदैठण येथे वीज पडून एकजण ठार, तर दोेघेजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नगरला हलविण्यात आले आहे. तसेच वीज पडून तीन बैल, एक म्हैस, पाच शेळ्या दगावल्या. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
भरत हरिभाऊ ढाणे (वय ४४, रा. सातेफळ, ता. जामखेड) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये कैलास गणपत डुचे (रा. खुरदैठण, ता. जामखेड) व लक्ष्मण दगडू ढाणे (वय ६०) यांचा समावेश असून पैकी लक्ष्मण ढाणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगरला हलविण्यात आले आहे.
जामखेड शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. भरत ढाणे शेतात म्हैस चारीत असताना अंगावर वीज पडून ते जागीच मयत झाले. तालुक्यातील खुरदैठण येथे कैलास गणपत डुचे हे शेतात बैल चारत असताना वीज पडली, त्यामुळे एक बैल मृत्यूमुखी पडला व ते स्वत:ही जखमी झाले. तिसरी घटना तालुक्यातील तरडगाव येथे घडली. श्यामराव रंगणाथ ढाळे हे शेतात बैल चारीत असताना त्यांचे दोन्ही बैल वीज पडून मृत्यूमुखी पडले. गयाबाई ढाणे यांच्याही दोन शेळ्या दगावल्या. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे.

Web Title: Jamkhed dies in electricity; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.