जालिंदर बोरुडे यांना ‘आदर्श नेत्रदूत’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:19 IST2021-01-21T04:19:10+5:302021-01-21T04:19:10+5:30

केडगाव : अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना नाशिक येथील बहुजन सेवा ...

Jalindar Borude awarded 'Adarsh Netradoot' award | जालिंदर बोरुडे यांना ‘आदर्श नेत्रदूत’ पुरस्कार

जालिंदर बोरुडे यांना ‘आदर्श नेत्रदूत’ पुरस्कार

केडगाव : अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना नाशिक येथील बहुजन सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श नेत्रदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती सेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे यांनी दिली.

बहुजन सेवा संघाच्यावतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब वंचित रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेद्वारे नवीन दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श नेत्रदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या पुरस्काराचे वितरण लवकरच नाशिक येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असल्याचे बहुजन सेवा संघाचे सचिव प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.

..

फोटो-जालिंदर बोरूडे

Web Title: Jalindar Borude awarded 'Adarsh Netradoot' award