रोहित पवार यांच्या हस्ते मोहरी तलावात जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:23+5:302021-09-09T04:26:23+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील मोहरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तलावाचे जलपूजन आमदार रोहित ...

रोहित पवार यांच्या हस्ते मोहरी तलावात जलपूजन
खर्डा : जामखेड तालुक्यातील मोहरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तलावाचे जलपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह गोलेकर, हनुमंत पाटील, रामहरी गोपाळघरे, हनुमान बारगजे, आबासाहेब येळे, हनुमंत हजारे, सूरज रसाळ, भाऊसाहेब श्रीरामे, बाळू बाबर, महालिंग कोरे, मनोज राजगुरू, कपील लोंढे आदी उपस्थित होते.
शहराच्या जवळ असणारा मोहरी तलाव हा खर्डा गावाची जीवनदायनी आहे. याच तलावातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून खर्डा गावाला पाणीपुरवठा होत आहे. हा तलाव भरल्याने खर्डेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीस पावसाने दडी मारली होती. यावर्षी तलावातील पाण्याची पातळी एकदम कमी झाली होती. त्यातच पाऊस न झाल्याने खर्डा शहराचा पाणीप्रश्न गंभीर होतो की काय असा प्रश्न पडला असतानाच परतीच्या पावसाने दिलासा मिळाला.
या आठवड्यात मध्यम व जोरदार पावसाने मोहरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होऊन पुढे खैरी प्रकल्पाकडे पाणी झेपावले. खैरी मध्यम प्रकल्पही भरण्याची शक्यता आहे.
---
०८ रोहित पवार