जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:11+5:302021-05-27T04:23:11+5:30

अहमदनगर : जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्यावतीने दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. ॲड. विकी ...

Jain Oswal Vatsalya distributes groceries to 70 needy families | जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप

अहमदनगर : जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्यावतीने दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात ७० गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा देण्यात आला. ॲड. विकी मुथा यांनी त्यांचे वडील ऑड. दिलीप मुथा यांच्या स्मरणार्थ ही मदत केली.

यावेळी विकी मुथा, अजय वसंतलाल बोरा, विजय मुथा यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. जय आनंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी यांच्या शोभानंद निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, नंदलाल कोठारी, किशोर पितळे, सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा, विजय गुगळे, महेश गुगळे, नूतन गांधी, संतोष कर्नावट आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिला बोरा, सी.ए. रमेश फिरोदिया, सविता रमेश फिरोदिया, अमित राजेंद्र चोपडा, पनालाल बोगावत, अजय अतुल बोरा, अभय श्रीश्रीमाळ, सतीश मुथा, किशोर गुगळे आदींचे सहकार्य लाभले.

यावेळी विकी मुथा म्हणाले, समाजात अनेक गरजू्‌ आपल्या आसपास असतात. त्यांनाही जगण्याची उमेद असते. कोविड काळात तर त्यांना माणुसकीच्या नात्याने अधिकाधिक मदत केली पाहिजे. सढळ हाताने मदत करणाऱ्यांना परमेश्वरही कधी काही कमी पडू देत नाही. अशाच उदात्त भावनेने जैन ओसवाल वात्सल्य संस्था गरजूंना सातत्याने आधार देत आहे. या कार्यात सहभागी होणे नेहमीच आनंददायी असते, असे प्रतिपादन मुथा यांनी व्यक्त केले.

विजय मुथा म्हणाले, सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा यांचा आदर्श समोर ठेवून संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. किराणा वाटपाचा हा उपक्रम सातत्यपूर्ण असून संस्थेच्या चांगल्या कार्यामुळे अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत.

अजय बोरा म्हणाले की, करोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. परंतु, या संकटातही जैन ओसवाल वात्सल्यसारख्या संस्था गरजवंतांना आधार देण्याचे काम करीत आहे. अशा संस्थांमुळेच मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद अनेकांना मिळते. संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेक्रेटरी विजय गुगळे यांनी आभार मानले.

--

फोटो- २६ जैन ओसवाल

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे ७० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आली. यावेळी अजित बोरा, ईश्वर बोरा आदी.

Web Title: Jain Oswal Vatsalya distributes groceries to 70 needy families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.