शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटनेतर्फे डवरी समाजातील २०० लोकांना धान्य, किराणा वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:54 IST

कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली.  त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने कामगार तलाठ्यामार्फत ३१ कुटूंबाला बुधवारी (दि.१ एप्रिल) धान्य व किराणा देऊन त्यांचा दहा दिवसाचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवला आहे. 

 अशोक निमोणकर/जामखेड : कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली.  त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने कामगार तलाठ्यामार्फत ३१ कुटूंबाला बुधवारी (दि.१ एप्रिल) धान्य व किराणा देऊन त्यांचा दहा दिवसाचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवला आहे.        पाटोदा व भवरवाडी गावचे कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे हे कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी भवरवाडी येथे गेले होते. तेथे माळरानाच्या परिसरात पाल ठोकून असलेले नागरिक दिसले. यावेळी त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता आम्ही बहुरूपी लोक एक वर्षापासून गावाबाहेर आहे. बहुरूपीची सोंग घेऊन दररोजचा उदरनिर्वाह करतो. कोरोनासारख्या रोगामुळे शहर व गावच बंद असल्याने पुन्हा गावाकडे आलो आहे. आमच्याकडे कुपन नाही. आधारकार्ड नाही व रहायला घर नाही. दोन दिवसापासून आम्ही उपाशी आहोत. मुले शिळे टुकडे खाऊन जगत आहेत. आमच्या पोटाला काम द्या. आमची भूक भागवा अशी विनवणी या लोकांनी केली.            कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे यांनी जामखेड येऊन घडलेली घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितली. तहसीलदार नाईकवाडे यांनी ही माहिती भारतीय जैन संघटनेचे अमोल तातेड यांना दिली. त्यांनी तातडीने पाच किलो गहू व किराणा सामानाचे ३१ कीट तयार केले. ते कामगार तलाठी प्रमोद कटारनवरे समवेत भवरवाडी येथील पालावर पोहोचले. पालात राहणा-या कुटूंबातील एका सदस्याला बोलावून घेऊन देऊन टाकले. उपाशीपोटी राहणाºया या कुटुंबाला धान्य मिळाल्याने त्यांचे चेहरे आनंदी झाले होते. या ३१ कुटूंबात सरासरी २०० च्या आसपास लहान, मोठे नागरिक आहेत.     भारतीय जैन संघटनेने पालावर राहणाºया या उपाशी भटक्या समाजाची भूक आठ, दहा दिवसाची भागवली? परंतु पुढे काय? असा प्रश्न तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यापुढे होता. जामखेडला शिवभोजन थाळीचा पर्याय नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. तोपर्यंत शहरातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले. त्यांच्याकडून आठ पोते गहू मिळाला. या गव्हाचे वाटप भवरवाडी, मोहरी, जातेगाव या ठिकाणी पालात राहणाºया नागरिकांना वाटप केले. लॉकडाऊनमुळे तालुक्यात कोणी उपाशीपोटी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. नागरिकांनी यासाठी आपल्यातला घास इतरांना देता येईल. तशी मदत धान्य, किराणा रूपी करावी, असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक