येळपणे येथे जगताप-पाचपुते गट समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:23+5:302020-12-28T04:12:23+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे, पिसोरे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक समोरासमोर भिडणार ...

Jagtap-Pachpute group face to face at Yelpane | येळपणे येथे जगताप-पाचपुते गट समोरासमोर

येळपणे येथे जगताप-पाचपुते गट समोरासमोर

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे, पिसोरे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक समोरासमोर भिडणार आहेत. त्यामुळे येळपणेचा निवडणूक आखाडा चांगलाच गाजणार आहे.

येळपणे ग्रामपंचायतीत पाच प्रभागांत १३ जागा आहेत. पाच हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येळपणेत स्व. अण्णा पाटील पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर यांच्या गटात यापूर्वी सामना रंगत होता.

या निवडणुकीत स्व. अण्णा पाटील पवार यांचे पुतणे व कुकडी साखर कारखान्याचे संचालक विवेक पवार व अनिल वीर यांनी एकत्र पॅनल केला, तर सतीश धावडे, नवनाथ देवकर यांनीही स्वतंत्र पॅनल तयार केला आहे. येळपणेत पाचपुते गटाची ताकद मोठी आहे. मात्र, पवार-वीर एकत्र आल्याने पाचपुते समर्थकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

अशा स्थितीत सतीश धावडे हे कसे डावपेच खेळतात, यावर ही निवडणूक रंगणार आहे. दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी गुप्त हालचाली सुरू आहेत. त्यामुळे येळपणेत भाऊबंदकीची लढाई उफाळून येण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Jagtap-Pachpute group face to face at Yelpane